SNO vs VEL, Women T20 Challenge Final: सुपरनोवाचे वेलोसिटीला 166 धावांचे लक्ष्य, Deandra Dottin ने केल्या 62 धावा

संघाकडून सलामीवीर डिआंड्रा डॉटिनने 62 धावांची शानदार खेळी केली. डॉटिनने प्रिया पुनिया (28) सोबत 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (43) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या.

डिआंड्रा डॉटिन (Photo Credit: Twitter/IPL)

Womens T20 Challenge Final: पुण्यातील एमसीए स्टेडियमवर वेलोसिटी (Velocity) आणि सुपरनोवा (Supernovas) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना खेळवला जात आहे. सुपरनोवा संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 165 धावा केल्या आणि वेलोसिटीला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले. संघाकडून सलामीवीर डिआंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) 62 धावांची शानदार खेळी केली. महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम (WT20C Final) सामन्यातील कोणत्याची संघाचीही सर्वाधिक धावसंख्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)