SL vs AUS Series 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी, व्हाईट बॉल मालिकेसाठी श्रीलंकेचा तात्पुरता संघ घोषित, ‘ज्युनियर मलिंगा’चा समावेश; पहा संपूर्ण Squad

श्रीलंकेने 7 जूनपासून मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी आणि व्हाईट-बॉल मालिकेसाठी त्यांच्या तात्पुरत्या संघांची घोषणा केली आहे. तीन टी-20, पाच वनडे आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. एकदिवसीय सामने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा एक भाग असेल, तर विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 सायकलचा अंतर्गत कसोटी मालिका खेळली जाईल.

मथीशा पथिराना (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

‘बेबी मलिंगा’ मथीशा पाथिरानाला (Matheesha Pathirana) ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी (Australia Series) श्रीलंकेच्या तात्पुरत्या T20 संघासाठी स्थान देण्यात आले आहे. हा अंतिम संघ नसला तरी, पाथिरानाला चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) 2022 मधील प्रभावी पदार्पणाच्या जोरावर संधी दिली आहे. तसेच भानुका राजपक्षेने पुनरागमन केले आहे. मात्र दुष्मंथा चमीराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement