IND Beat ENG 4th Test: शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या शानदार खेळीने भारताचा चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेटने विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी
इंग्लंडचा डाव 145 धावांवर आटोपला आणि भारतासमोर हे लक्ष्य ठेवण्यात आले. भारतीय संघाने आजचा हा सामना जिंकला तर ती मालिका 3-1 ने जिंकेल.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला पाहुणा संघ 353 धावांत सर्वबाद झाला. तर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 307 धावा करता आल्या. इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवरच मर्यादित राहिला. त्यामुळे भारताला आता विजयासाठी 192 धावा कराव्या लागणार आहेत. दरम्यान, दुस-या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने 5 गमावून लक्ष्य गाठले. शुभमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्यात सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी भारताला जिंकून दिली. यासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली. भारताची धावसंख्या 5 विकेट्स (61 षटके) 192 धावा होती.
पाहा पोस्ट -