Shubhman-Ishan Meets Brian Lara Video: वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर शुबमन गिल आणि ईशान किशनने घेतली ब्रायन लाराची भेट, पहा व्हिडिओ

मालिका विजयानंतर, फॅनबॉय इशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये महान ब्रायन लाराला भेटण्याची आणि संवाद साधण्याची सुवर्ण संधी मिळाली.

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांच्या (IND v WI) मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. दरम्यान, मालिका विजयानंतर, फॅनबॉय इशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये महान ब्रायन लाराला भेटण्याची आणि संवाद साधण्याची सुवर्ण संधी मिळाली. त्रिनिदादमध्ये इशान आणि शुभमनने दिग्गज क्रिकेटपटूशी संवाद साधला. याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ईशान किशनने हे देखील उघड केले की त्याला एकदा इंस्टाग्रामवर ब्रायन लाराचा मेसेज आला होता. (हे देखील वाचा: IND vs WI T20 Series 2023: वनडे नंतर होणार पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा मोठा धमाका, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now