Shreyas Iyer च्या खराब कामगिरीवर चाहते भडकले, Ajinkya Rahane ला परत घेवून येण्याची केली मागणी, पाहा ट्विट

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय टॉप ऑर्डरने तशी कामगिरी केली नाही. रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला, तर पुन्हा एकदा श्रेयस अय्यर (Shryas Iyer) मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी देण्याची मागणी चाहत्यांनी सुरू केली.

Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने गोलंदाजीपूर्वी आफ्रिकन संघावर दबाव आणला. पण त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय टॉप ऑर्डरने तशी कामगिरी केली नाही. रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला, तर पुन्हा एकदा श्रेयस अय्यर (Shryas Iyer) मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी देण्याची मागणी चाहत्यांनी सुरू केली. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. तसेच, आजच्या दिवशी दुसरीकडे भारताचा पहिला डाव 153 धावांवर गारद झाला आणि 98 धावाची आघाडी घेतली. भारताने शेवटच्या पाच फलंदाजाना एकही धाव न करता शुन्यावर विकेट गमावल्या. (हे देखील वाचा: SuryaKumar Yadav ला ICC कडून मिळू शकतो वर्षातील सर्वात मोठा पुरस्कार, 'या' खेळाडूंशी होणार स्पर्धा)

पाहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement