IND vs AFG World Cup 2023: रोहित शर्माला मागे टाकून श्रेयस अय्यरने वर्ल्ड कपमधील सर्वात लांब षटकार ठोकला, पाह व्हिडिओ
श्रेयस अय्यरने 101 मीटर लांब षटकार मारून रोहित शर्माला मागे सोडले.
विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील सामन्यात क्रिकेटप्रेमींना अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अवघ्या 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली आणि भारताच्या 8 विकेट्सने विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 25 चौकार आणि सात षटकार मारले, तर भारतीय फलंदाजांनी 28 चौकार आणि आठ षटकार ठोकले. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषकात त्याच्या शतकादरम्यान 93 मीटरचा सर्वात लांब षटकार मारला होता, पण या सामन्यात हा विक्रम मोडला गेला. श्रेयस अय्यरने 101 मीटर लांब षटकार मारून रोहित शर्माला मागे सोडले. श्रेयसने 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा केल्यानंतर या सामन्यात नाबाद राहिला.
पहा व्हिडिओ