Shoaib Bashir Visa Issues: शोएब बशीरला मिळाला व्हिसा, 'या' आठवड्यात येणार भारतात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार, 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत आहे. भारतात फिरकीपटूंना अधिक मदत मिळते, त्यामुळे शोएब बशीर हा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण व्हिसाच्या समस्येमुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही

Photo Credit - Twitter

IND vs ENG Test Series 2024: इंग्लंड क्रिकेट संघात समाविष्ट असलेला पाकिस्तानचा वंशाचा खेळाडू शोएब बशीरला भारताचा व्हिसा मिळू शकला नाही, त्यामुळे तो संघासह हैदराबादला पोहोचला नाही. मात्र आता त्याला व्हिसा मिळाला असून तो या आठवड्यात भारतात येऊन टीम इंग्लंडमध्ये सामील होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार, 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत आहे. भारतात फिरकीपटूंना अधिक मदत मिळते, त्यामुळे शोएब बशीर हा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण व्हिसाच्या समस्येमुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंडने एक दिवस अगोदर बुधवारीच आपली प्लेइंग 11 जाहीर केली. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: इंग्लंडविरुद्ध 'या' भारतीय फलंदाजांनी केला कहर, सर्वाधिक केल्या धावा; येथे पाहा संपूर्ण यादी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement