'इंडियाने मरवा दिया' टीम इंडियाच्या हार नंतर शोएब अख्तर झाला दुखी, व्हिडीओ शेअर करुन दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भारताच्या पराभवामुळे दु:खी झाला आहे.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

भारताच्या (IND) पराभवाने पाकिस्तानच्या (PAK) उपांत्य फेरीच्या (Semi Final) आशा मावळ्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भारताच्या पराभवामुळे दु:खी झाला आहे. शोएब अख्तर म्हणाला भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली असती तर 150 धावा केल्या असत्या, असे त्याने आपल्या नवीन यूट्यूब व्हिडीओमध्ये म्हटले आहे. शोएब अख्तर म्हणाला, “भारताने आम्हाला दुखावले आहे. खरे तर यात भारताचा काही दोष नाही, आम्ही खूप वाईट खेळलो आणि आमचे नशीब इतरांवर सोडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)