TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: शाहबाज अहमदला लखनौने 2.40 कोटींना खरेदी केले
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी शाहबाज अहमदसाठी बोली लावली, नंतर सनरायझर्स हैदराबाद देखील त्यात सामील झाले. लखनौ आणि हैदराबाद यांच्यात जोरदार संघर्ष झाला. सुरुवातीपासून त्याच्यासाठी बोली लावणारा लखनौचा संघ जिंकला. लखनऊने त्याला 2.40 कोटी रुपयांना खरेदी केले.