IND vs AUS 1st Test 2023: नागपूरची खेळपट्टी पाहूनच ऑस्ट्रेलियन संघाला फुटला घाम, स्टीव्ह स्मिथला सतावू लागली 'ही' भीती
या सर्व अटकळांच्या दरम्यान आता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीचे पहिले चित्र समोर आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी 9 फेब्रुपासून सुरुवात सुरुवात होत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy) अंतर्गत होणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना नागपुरात (Nagpur) होणार आहे. नागपुरात होणार्या या कसोटीपूर्वी तेथील खेळपट्टीबाबत बरीच चर्चा रंगली होती. या सर्व अटकळांच्या दरम्यान आता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीचे पहिले चित्र समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याचा आढावा घेताना दिसत आहे. त्याचवेळी, खेळपट्टीचा स्थिती पाहून स्मिथनेही मीडियासमोर वक्तव्य केले आहे. सामन्यापूर्वीच त्याला भारतीय डावखुऱ्या फिरकीपटूंची भीती वाटू लागली असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. खेळपट्टीचा आढावा घेतल्यानंतर स्मिथने आपल्या वक्तव्यात खेळपट्टी कोरडी असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की खेळपट्टीचा एक भाग खूप कोरडा आहे जिथे डावखुरा फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो. स्मिथ म्हणाला की डावखुरा फिरकीपटू आमच्या डाव्या हाताच्या गोलंदाजांसाठी चेंडू आत आणू शकतात. विशेष बाब म्हणजे, जर ग्रीन खेळला नाही आणि मॅथ्यू रेनशॉला संधी मिळाली तर ऑस्ट्रेलियाचे टॉप-7 फलंदाजांपैकी पाच डावखुरे असतील.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)