ENG vs SL 1st Test Day 2 Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडने 6 गडी गमावून केल्या 259 धावा, जेमी स्मिथची शानदार खेळी; यजमान संघ 23 धावांनी पुढे
ENG vs SL: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. यासह यजमान संघाने 23 धावांची आघाडीही मिळवली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज जेमी स्मिथ नाबाद 72 धावा करुन क्रिजवर आहे. याशिवाय गस ॲटकिन्सनही 4 धावा करून नाबाद आहे.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. यासह यजमान संघाने 23 धावांची आघाडीही मिळवली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज जेमी स्मिथ नाबाद 72 धावा करुन क्रिजवर आहे. याशिवाय गस ॲटकिन्सनही 4 धावा करून नाबाद आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत करण्याची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवर असेल. तिसरा दिवस दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. पाहुणा संघ इंग्लंडला लवकर ऑल आऊट करण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी, श्रीलंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून कर्णधार धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक 74 धावा केल्या. याशिवाय मिलन प्रियनाथ रथनायकेने 72 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर यांनी 3-3 बळी घेतले. तर गुस ऍटकिन्सन आणि मार्क वुडने एक विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)