IND vs SA 1st Test Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या सामन्याला थोडयाच वेळात होणार सुरुवात, येथे पाहा लाइव्ह

IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसीद कृष्णाने भारतासाठी पदार्पण केले आणि डेव्हिड बेडिंगहॅमने दक्षिण आफ्रिकेसाठी नांद्रे बर्जरसह पदार्पण केले. पहिल्या दिवशी भारताचा स्कोर 208/8 आहे. लोकेश राहुल 70 धावा करून नाबाद आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्यावेळात सुरुवात होणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेल स्टार स्पोर्ट्स एचडी 1, स्टार स्पोर्ट्स एचडी 2 या टीव्हीवर पाहू शकता. तुम्ही टीव्हीवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॉमेंट्री ऐकू शकता. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर ओटीटी वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रवाह पाहू शकता. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही कन्नड, तामिळ आणि तेलुगु भाषेतील कॉमेंट्री ऐकू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now