Sarfaraz Khan Century: सरफराज खानने कठीण परिस्थितीत बॅटने दाखवली आपली ताकद, कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले
भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज खानने बंगळुरूमध्ये दमदार कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज खानने बंगळुरूमध्ये दमदार कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराजने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
Maiden Test 💯! 👏 👏
What a cracker of a knock this is from Sarfaraz Khan! ⚡️⚡️
Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UTFlUCJOuZ
— BCCI (@BCCI) October 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2024 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

