Sanjana Ganesan Birthday: जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाला खास पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला डान्सिंग व्हिडिओ
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा आज 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जसप्रीत बुमराहने तिला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
Sanjana Ganesan Birthday: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा (Sanjana Ganesan) आज 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जसप्रीत बुमराहने तिला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. बुमराहने (Jasprit Bumrah) त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संजना गणेशन प्रसिद्ध रॅपर केंड्रिक लामरच्या 'नॉट लाईक अस' गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत बुमराहने एक नोटही लिहिली, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये त्यात प्रेम इमोजी वापरली आहे. तू नेहमी आनंदी राहा आणि भरपूर प्रेम मिळव अशी इच्छा आहे. अंगद आणि मी नेहमीच तुझ्यासोबत राहू, चांगल्या काळात असो किंवा वाईट काळात. आम्ही तुला खूप प्रेम करतो." अलीकडेच, संजनाने तिचा मुलगा अंगदबद्दल सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला चोख उत्तर दिले होते. बुमराह आणि संजना दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि अनेकदा एकमेकांसोबतचे सुंदर क्षण शेअर करतात.
जसप्रीत बुमराहने संजना गणेशनला दिल्या खास शुभेच्छा