पारंपरिक फेट्यात दिसला Sachin Tendulkar चा मराठी स्वॅग; आपल्या पुतणीच्या लग्नात असा झाला तयार (Watch Video)

या व्हिडीओमध्ये सचिन मराठी फेटा बांधून घेत असलेला दिसत आहे. सचिनचा मोठा भाऊ नितीन यांची मुलगी करिष्माच्या लग्नातील हा व्हिडीओआहे.

Sachin Tendulkar (संग्रहित संपादित प्रतिमा)

सचिन तेंडुलकरला क्रिकेट जगताचा देव म्हटले जाते. सचिन केवळ त्याच्या क्रिकेट रेकॉर्ड आणि खेळामुळेच चर्चेत असतो असे नाही, तर चाहत्यांना त्याच्या कुटुंबाच्या बातम्यांबद्दलही खूप उत्सुकता असते. सचिन आणि त्याचे कुटुंब नेहमीच अनेक मराठी सण-उत्सव, कार्यक्रम, समारंभ यांमध्ये हिरारीने भाग घेताना दिसले आहेत. आताही असाच एका पारंपरिक वेशातील सचिनचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन मराठी फेटा बांधून घेत असलेला दिसत आहे. सचिनचा मोठा भाऊ नितीन यांची मुलगी करिष्माच्या लग्नातील हा व्हिडीओआहे. आपल्या पुतणीच्या लग्नात सचिन तयार होतानाचा हा व्हिडीओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement