Sachin Tendulkar Statue Unveiling Video: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण, चाहत्याकडून 'सचिन-सचिन'चा जयघोष (Watch Video)
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
आज 1 नोव्हेंबरला मुंबईच्या प्रतिष्ठेच्या वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सचिन-सचिनचा नारा लागुन या स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या आकारमानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील वनडे वर्ल्ड कपचा सामना 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पुतळ्याचे आज सायंकाळी साडेपाच वाजता अनावरण करण्या आले. वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा हा 22 फुटी पुतळा उभारण्यात आला असून आंतरराष्ट्रीय मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो तयार केला आहे. (हे देखील वाचा: NZ vs SA, World Cup 2023 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला दिले 358 धावांचे लक्ष्य, डी कॉक आणि डुसेन यांनी झळकावली शतके)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)