RR Beat PBKS, IPL 2024 27th Match Live Score Update: रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 विकेटने विजय, शिमरॉन हेटमायरची मॅच विनिंग खेळी

पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना पंजाबमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला आहे. यासह राजस्थान रॉयल्सने या मोसमातील पाचव्या विजयाची नोंद केली आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून स्टार फलंदाज आशुतोष शर्माने सर्वाधिक 31 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून केशव महाराज आणि आवेश खान यांनी सर्वाधिक दोन बळी घेतले. राजस्थान रॉयल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना 19.5 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 39 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)