RR vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी केला पराभव, आरसीबीच्या गोलंदाजांची शानदार गोलंदाजी

दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव केला.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 60 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs CSK) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 55 धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून अॅडम झम्पा आणि केएम आसिफने प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ 10.3 षटकांत केवळ 59 धावांवर गारद झाला. राजस्थान रॉयल्सकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 35 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून वेन पारनेलने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement