WI vs ZIM T20 WC 2022: रोव्हमन पॉवेलने 104 मीटर गगनचुंबी षटकार मारला, दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या अकील हुसेनने कपाळाला लावला हात (Watch Video)
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 154 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ केवळ 122 धावा करू शकला.
T20 विश्वचषकाच्या आठव्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. होबार्टमध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 154 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ केवळ 122 धावा करू शकला. या दरम्यान, पॉवर हिटर पॉवेलने शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकले. यापैकी एकामध्ये 104 मीटरच्या लांब षटकाराचा समावेश होता. पॉवेलचा हा षटकार पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला फलंदाज हुसेनही थक्क झाला आणि तो चेंडू शेवटपर्यंत पाहत राहिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)