IND vs PAK: रोहित शर्माने सराव करताना या गोलंदाजाला सांगितले खूप धोकादायक, आयसीसीने व्हिडीओ केला शेअर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) उर्वरित खेळाडूंसोबत नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. यावेळी त्याने एका गोलंदाजाचे कौतुक करत तो खूप धोकादायक गोलंदाज असल्याचे सांगितले.

Photo Credit - Twitter

भारतीय संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यासाठी तयारी करत आहे. भारतीय क्रिकेटपटूंनीही शनिवारी मेलबर्नमध्ये जोरदार सराव केला. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) उर्वरित खेळाडूंसोबत नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. यावेळी त्याने एका गोलंदाजाचे कौतुक करत तो खूप धोकादायक गोलंदाज असल्याचे सांगितले. आयसीसीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. मोहम्मद शमी त्याच्यासाठी नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. रोहितने त्याच्याबद्दल म्हटले आहे की, "तो एक अतिशय धोकादायक गोलंदाज आहे. सर्वात धोकादायक." यादरम्यान रोहित दिनेश कार्तिकच्या काही शॉट्सचे कौतुक करताना दिसत आहे, जे तो विकेटच्या मागे मारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement