IND vs BAN 1st Test 2022: पहिल्या कसोटी मालिकेतुन रोहित शर्मा बाहेर, अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान, केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व

या दरम्यान बीसीसीआयने मोठे अपडेड दिले आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे.

केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग पहिले दोन सामने गमावल्यामुळे भारताला मालिका जिंकता आली नसली, तरी टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीमुळे आगामी सामन्यांचा उत्साह वाढणार आहे. वनडेनंतर आता भारताला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांचा सामना करायचा आहे. या दरम्यान बीसीसीआयने (BCCI) मोठे अपडेड दिले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे तर अभिमन्यू ईश्वरन संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर पडले असुन त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमारला संधी देण्यात आली आहे. निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)