Rohit Sharma ने केला मोठा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा ठरला पहिला भारतीय
त्याने केलेल्या या फलंदाजीने त्याने आपल्या नावावर नवीन रेकाॅड स्थापन केला आहे.
Rohit Sharma 500 Sixes: रोहित शर्माने (Rohit Sharma) बांगलादेश विरुद्ध मॅच जिंकुन दिली नाही पण त्याच्या आक्रमक फंलदाजीनं सगळ्याची मंन जिंकली. दुखापत असुनही रोहित शर्मा आठव्या स्थानावर खेळायला आला त्याच्या आक्रमक फलंदाजीने सगळ्याना वाटल की तो सामना जिंकुन देईल पण असे काही झाले नाही. त्याने केलेल्या या फलंदाजीने त्याने आपल्या नावावर नवीन रेकाॅड स्थापन केला आहे. रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध 28 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने 5 जबरदस्त षटकार आणि 3 चौकार मारले, पाचवा षटकार मारताच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हा पराक्रम करणारा रोहित हा दुसरा फलंदाज आहे. या यादीत आतापर्यंत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल एकटाच होता पण आता रोहितही या यादीत सामील झाला आहे. तसेच हा पराक्रम करणार तो पहिला भारतीय आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)