Rohit Sharma: मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला दुखापत, संघाचा तणाव वाढला
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला असून, सराव सत्रादरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला.
Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ( Border Gavaskar trophy)मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ( Boxing Day Test)टीम इंडियाला मोठा झटका बसला असून, सराव सत्रादरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी (Rohit Sharma Injury)झाला. भारताच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयाचा सामना करताना रोहितला दुखापत झाली, त्यानंतर तो अस्वस्थ होता. यानंतरही त्याने काही काळ फलंदाजी सुरू ठेवली असली तरी अखेर त्याने सराव सोडण्याचा निर्णय घेतला.
संघाचा तणाव वाढला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)