Rohit Sharma Fifty: रोहित शर्माने वेगवान फलंदाजी करत अवघ्या 35 चेंडूत झळकावले अर्धशतक
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या डावात झंझावाती सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 108 षटकांत 5 गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 128 षटकांत 473 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 121 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 115.4 षटकात 255 धावांवर गारद झाला. टीम इंडियाने 183 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या डावात झंझावाती सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. टीम इंडियाचा स्कोर 84/0