IND vs AUS 1st T20I: डीआरएस रिव्ह्यूदरम्यान रोहित शर्माने पकडली दिनेश कार्तिकची मान; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले फनी मीम्स

प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे लक्ष्य 19.2 षटकांत पार केले. या सामन्यात गोलंदाजाची खराब कामगिरी पाहायला मिळाली.

IND vs AUS 1st T20I: डीआरएस रिव्ह्यूदरम्यान रोहित शर्माने पकडली दिनेश कार्तिकची मान; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले फनी मीम्स
Photo Credit - Twitter

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे लक्ष्य 19.2 षटकांत पार केले. या सामन्यात गोलंदाजाची खराब कामगिरी पाहायला मिळाली. तसेच सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यातील एका क्षणाने इंटरनेटवर तुफान चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 12व्या षटकात, मैदानावरील पंचाने ग्लेन मॅक्सवेलला नॉट आऊट दिल्यानंतर भारताने डीआरएस मागणी केली. जेव्हा, निकाल भारताच्या बाजूने लागला, तेव्हा रोहित कार्तिकची मान पकडताना दिसला, ज्यामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स तयार केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2022 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).