Rohit Sharma New Record: रोहित शर्माने एमएस धोनीचा मोडला विक्रम, भारतात खेळताना सर्वाधिक षटकाराचा विक्रम केला नावावर

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतात खेळताना सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे आणि त्याने माजी कर्णधार एमएस धोनीलाही मागे टाकले आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma Most Six India: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ ODI) 18 जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (IND vs NZ 1st ODI) खेळवला जात आहे. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतात खेळताना सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे आणि त्याने माजी कर्णधार एमएस धोनीलाही मागे टाकले आहे. धोनाने भारतात एकदिवसीय क्रिकेट खेळताना 123 षटकार ठोकले आहेत. त्याचवेळी रोहित शर्माने भारतात खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये 125 षटकारही ठोकले आहेत. किवीविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन षटकार ठोकताच रोहितने एमएस धोनीचा हा विक्रम मोडला असून, रोहित सिक्सर किंग बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)