Rohit Sharma Baby Boy Name: क्रिकेटर रोहित शर्मा- रितिका सजदेह यांच्या मुलाचं नाव 'अहान'; या क्यूट फोटोतून केलं जाहीर
रोहित शर्माच्या पत्नीने 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला आहे
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी Ritika Sajdeh ने त्यांच्या नवजात मुलाचं नाव ‘Ahaan’ठेवलं आहे. एका सोशल मीडीया पोस्ट मध्ये ख्रिसमस फिगर्स मध्ये चौघांची नावं लिहली आहेत. त्यावर मुलाचं नाव अहान लिहलेली एक फिगर आहे. या क्युट पोस्ट मधून मुलाचं नाव सांगण्यात आलं आहे. अहान या हिंदू नावाचा अर्थ जागृती, चेतना असा होतो. बाळासाठी तो सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरीजला मुकला होता. 15 नोव्हेंबरला रोहित शर्माला पुत्ररत्नाचा लाभ झाल्याची माहिती त्याने अशाच एका पोस्ट द्वारा दिली होती.
रोहित शर्माच्या मुलाचं नाव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)