IND vs NZ 3rd ODI Live Score: रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दिली शानदार सुरुवात, गिलचे तोबडतोब अर्धशतक पुर्ण

न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma And Shubman Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या 9 षटकात 65 धावा केल्या आहेत. या दरम्यान गिलने आपले तोबडतोब अर्धशतक पुर्ण केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now