IND vs AUS 3rd T20: रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकची मॅचदरम्यान पाहायला मिळाली बॉन्डिंग, जाणून घ्या काय झाले असे (Watch Video)
अक्षर पटेलच्या थ्रोवर ग्लेन मॅक्सवेल रनआउट झाला. दरम्यान, दिनेश कार्तिकच्या चुकीमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळण्याची खात्री होती, पण कार्तिक नशीबवान होता की भारताला विकेट मिळाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात रविवारी हैदराबादमध्ये तिसरा टी-20 सामना खेळला गेला. टीम इंडियाने (Team India) प्रथम येथे मैदानात उतरून ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच धक्के देण्यास सुरुवात केली. टीम इंडिया जेव्हा मैदानात उतरत होती, तेव्हा पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) बॉन्डिंग पाहायला मिळाली. अक्षर पटेलच्या थ्रोवर ग्लेन मॅक्सवेल रनआउट झाला. दरम्यान, दिनेश कार्तिकच्या चुकीमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळण्याची खात्री होती, पण कार्तिक नशीबवान होता की भारताला विकेट मिळाली. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) थोडा रागातही दिसला, पण विकेट मिळाल्याने कर्णधार रोहित शर्माने खुश होवून दिनेश कार्तिकच्या हेल्मेटला किस केले. दोघांचा हा फोटो पाहून सोशल मीडियावरही व्हायरल झाला.