ICC Test Team of the Year 2021: रोहित शर्मा याच्यासह टीम इंडियाचे हे दोन धुरंधर 2021 च्या ICC पुरुष कसोटी संघात; केन विल्यमसन कर्णधार

तर केन विल्यमसनची 2021 मधील पुरूष संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित आणि पंतने मायदेशासह परदेशात प्रभावी कामगिरी केली आणि गेल्या वर्षी भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्यात दोघे आघाडीवर राहिले.

रिषभ पंत आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma), रिषभ पंत आणि आर अश्विन (R Ashwin) यांना ICC पुरुष 2021 च्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर केन विल्यमसनची (Kane Williamson) 2021 मधील पुरूष संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान संघातील 36 वर्षीय फवाद आलम, वेगवान गोलंदाज हसन अली आणि 21 वर्षीय शाहीन आफ्रिदी, या तीन धुरंधर खेळाडूंचाही 11 मध्ये समावेश झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)