LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Live Toss Update: ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली, गुजरात करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघांनी प्लेइंग 11
या हंगामात ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. तर, गुजरातची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Lucknow Super Giants vs Gujarat Titans, TATA IPL 2025 26th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 26 वा सामना आज म्हणजेच 12 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. तर, गुजरातची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ: निकोलस पूरन, एडन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई.
गुजरात: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)