IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Score Update: रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार मारून कोलकाताला मिळवून दिला विजय, रशीद खानची हॅट्ट्रिक निष्फळ (Watch Video)
कोलकाताने सात गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरातचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे.
आयपीएल 2023 च्या 13 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कोलकात्यासमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकाताने सात गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरातचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 204 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना विजय शंकरने शानदार नाबाद 63 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने 20 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 83 धावांची खेळी खेळली. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)