RR vs RCB, IPL 2024 Eliminator Live Score Update: आरसीबीने राजस्थानसमोर ठेवले 173 धावांचे लक्ष्य, आवेशने घेतल्या तीन विकेट

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूने राजस्थानसमोर धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून रजत पाटीदार सर्वाधिक 34 धावा केल्या. तर दुसरीकडे, राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूने राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून रजत पाटीदार सर्वाधिक 34 धावा केल्या. तर दुसरीकडे, राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement