IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रवींद्र जडेजानं फोटो शेअर करुन दिली माहिती

तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज 27 जुलै रोजी होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. तथापि, हवामान यात अडथळा ठरू शकतो, कारण तिसऱ्या वनडेदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज (WI) गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली, भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज 27 जुलै रोजी होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. तथापि, हवामान यात अडथळा ठरू शकतो, कारण तिसऱ्या वनडेदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसरी वनडे पावसात वाहून जाऊ शकते.  यातच आता रवींद्र जडेजानंही (Ravindra Jadeja) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Photo Credit - Instagram
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement