Ravindra Jadeja Ruled out of IPL 2022: रवींद्र जडेजा आयपीएलच्या मध्यातून बाहेर, चेन्नई सुपर किंग्जने जरी केले निवेदन

Ravindra Jadeja Ruled out of IPL 2022: बरगडीच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा IPL 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडल्याची CSK CEO कासी विश्वनाथन यांनी बुधवार, 11 मे रोजी पुष्टी केली. चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू खेळाडूचा या हंगामात बॅट आणि बॉलमध्ये खराब वेळ गेला असून 10 सामन्यांमध्ये त्याने केवळ 116 धावा केल्या आणि फक्त 5 विकेट घेतल्या.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

Ravindra Jadeja Ruled out of IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मध्यातून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी संध्याकाळी एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात जडेजाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या खेळाबाबत शंका निर्माण झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now