'Main Kya Karu? Job Chod Du?': रोहित शर्माच्या 'या' निर्णयावर अश्विनची धम्माल प्रतिक्रीया

सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पुजाराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर विनोदी प्रतिक्रीया मीमद्वारे दिली.

भारत-ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार सामन्यांत 25 बळी घेऊन रविचंद्रन अश्विन (Ravi Ashwin) सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तर 22 विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजासोबत तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला आहे. चौथ्या कसोटीच्या अंतिम सत्रात स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांची विकेट काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्व पर्यायाचा वापर करुन ही यश न आल्यानंतर चेंडू त्यांने चेतेश्वर पुजाराकडे (Cheteshwar Pujara) सोपावला. हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पुजाराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर विनोदी प्रतिक्रीया मीमद्वारे दिली. मैं क्या करू? जॉब छोड दू  (Main kya karu? Job chod du) असे विनोदी मीम त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले.

पहा मीम -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now