Ranji Trophy 2023-24 Winner: रणजी ट्रॉफीच्या जेतेपदावर मुंबई चं पुन्हा 8 वर्षांनी नाव; विदर्भ वर 169 धावांनी मात
मुंबई संघाने आज 42 व्या वेळेस रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे.
मुंबई संघाने शानदार कामगिरी करत 8 वर्षांनी पुन्हा रणजी ट्रॉफीचं जेतेपद मिळवलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर मुंबई विरूद्ध विदर्भात सुरू असलेल्या अंतिम सामन्यात 169 धावांनी विदर्भ वर मुंबईने विजय मिळवला आहे. 538 धावांचा पाठलाग करताना विदर्भ आपल्या दुसर्या डावात 418 धावा करू शकला. विदर्भाचं तिसर्यांदा जेतेपदाचं स्वप्न तुटलं आहे. तर मुंबई ची ही विजेतेपदाची 42 वी वेळ आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)