Ranji Trophy 2022 Quarterfinals: आजपासून रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे मनोरंजन सुरु, या आठ संघांमध्ये होणार लढत

बाद फेरीत बंगालचा सामना झारखंडशी, मुंबईचा सामना उत्तराखंडशी, कर्नाटकचा उत्तर प्रदेशशी आणि पंजाबचा मध्य प्रदेशशी सामना होणार आहे. या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये साखळी फेरीनंतर बंगाल, मध्य प्रदेश, मुंबई, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड हे आठ संघ आता सेमीफायनलसाठी एकमेकांशी भिडतील.

रणजी ट्रॉफी (Photo Credit: Twitter/BCCIDomestic)

Ranji Trophy 2022 Knockout: रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून (6 जून) सुरू होत आहेत. यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये लढत होणार आहे. हे चार सामने 6 ते 10 जून दरम्यान बेंगलोर येथे खेळवले जातील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)