Ranji Trophy 2022: अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुलची दिल्लीच्या रणजी संघात निवड, प्रदीप सांगवान करणार नेतृत्व

U19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल याला बुधवारी दिल्लीच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आणि संघाचे नेतृत्व प्रदीप सांगवान करणार आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही दिल्ली संघात स्थान देण्यात आले, तर इशांत शर्मा रणजी करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध नसल्याची पुष्टी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) केली आहे.

यश धुल (Photo Credit: PTI)

Ranji Trophy 2022: भारताचा अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल (Yash Dhull) याला बुधवारी दिल्लीच्या रणजी संघात (Delhi Ranji Squad) स्थान देण्यात आले आणि संघाचे नेतृत्व प्रदीप सांगवान करणार आहे. दिल्ली संघाला तामिळनाडू, छत्तीसगड आणि झारखंड सोबत गटात ठेवण्यात आले आहे आणि त्यांचे सर्व गट एच सामने गुवाहाटी येथे होणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement