Ranji Trophy 2022: बिहारच्या 22 वर्षीय सकीबुल गनी याचा विश्वविक्रम; प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावणारा ठरला पहिला फलंदाज

बिहारचा 22 वर्षीय साकिबुल गनी प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. प्लेट गटातील सामन्यात त्याने मिझोरामविरुद्ध 341 धावा पूर्ण केल्या. साकिबुल गनीने बिहारच्या पहिल्या डावात केवळ 405 चेंडूत 341 धावांच्या खेळीत 2 षटकार आणि 56 चौकार खेचले. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी पदार्पणात तिहेरी शतक ठोकणारा गनी हा पहिला फलंदाज आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Ranji Trophy 2022: बिहारचा (Bihar) 22 वर्षीय फलंदाज साकीबुल गनी (Sakibul Gani) याने शुक्रवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First-Class Cricket) पदार्पणातच एका फलंदाजाने सर्वोच्च धावसंख्येचा नवा विश्वविक्रम रचला आहे. कोलकाता (Kolkata) येथील जाधवपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस 2nd मैदानावर झालेल्या प्लेट ग्रुपच्या सलामीच्या सामन्यात गनीने बिहारसाठी मिझोराम  Mizoram) विरुद्ध 341 धावा ठोकल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement