DC vs RR IPL 2024 Toss Update: राजस्थानने नाणेफेक जिंकली, दिल्ली विरुद्ध गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला विजय आवश्यक आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 56 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होणार आहे. प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला विजय आवश्यक आहे. त्यांनी आत्तापर्यंत 11 सामन्यांतील 11 पैकी 5 सामन्यांत विजय आणि 6 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. तर राजस्थानने 10 सामन्यांमधील 8 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन: जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)