Rajasthan Beat Kolkata: राजस्थाने कोलकात्याचा नऊ गडी राखून केला पराभव; यशस्वी जैस्वालने 98 आणि सॅमसनने केल्या 48 धावा
दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या होम ग्राउंड ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या मोसमातील 56 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या होम ग्राउंड ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने केवळ 13.1 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सच्या वतीने सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान फलंदाजी करताना सर्वाधिक 98 धावांची नाबाद खेळी खेळली.
Match 56. Rajasthan Royals Won by 9 Wicket(s) https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 10:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

