CSK vs GT, IPL Final 2023: अहमदाबादमध्ये फायनलपूर्वी पावसाला सुरुवात, जाणून घ्या आज सामना न झाल्यास कोण होणार विजेता
कव्हर्स जमिनीवर आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास नाणेफेकीला थोडा विलंब होऊ शकतो. पावसाची संततधार सुरू राहिल्यास सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम करण्यात आले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील दुसरा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Chennai Super King) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे. कव्हर्स जमिनीवर आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास नाणेफेकीला थोडा विलंब होऊ शकतो. पावसाची संततधार सुरू राहिल्यास सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यातील किमान 5 षटके पूर्ण होऊ शकली नाहीत, तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. फायनलमध्ये पावसामुळे सामन्याची वेळ वाढू शकते. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे खेळाडू सध्या ड्रेसिंग रूममध्ये आहेत. त्याच वेळी, सुपर ओव्हरसाठी कट ऑफ वेळ रात्री 12:50 पर्यंत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)