R Ashwin Withdraw From 3rd Test: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का; कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे आर अश्विन तिसऱ्या कसोटीतून बाहेर

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुटुंबातील वैद्यकीय आणीबाणीमुळे अश्विनने सामना अर्धवट सोडून आपल्या घरी रवाना केला आहे. याचा अर्थ टीम इंडिया शनिवारी मैदानात उतरेल तेव्हा अश्विन नसेल आणि त्याच्या जागी पर्यायी खेळाडू मैदानात उतरेल.

R Ashwin (Photo Credit - Twitter)

R Ashwin Withdraw From 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी 500 कसोटी बळी घेत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या सामन्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुटुंबातील वैद्यकीय आणीबाणीमुळे अश्विनने सामना अर्धवट सोडून आपल्या घरी रवाना केला आहे. याचा अर्थ टीम इंडिया शनिवारी मैदानात उतरेल तेव्हा अश्विन नसेल आणि त्याच्या जागी पर्यायी खेळाडू मैदानात उतरेल. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रकाशनात असे लिहिले आहे की, 'रविचंद्रन अश्विनला तत्काळ कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे, कारण त्याच्या कुटुंबात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. या कठीण काळात बीसीसीआय पूर्णपणे रविचंद्रन अश्विनच्या पाठीशी उभी आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.’ (हेही वाचा: Varun Aaron First Class Retirement: रणजी ट्रॉफी दरम्यान वरुन आरोनने जाहीर केली निवृत्ती, 'या' संघासोबत खेळणार शेवटचा सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement