SRH vs PBKS, IPL 2025 27th Match Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

SRH vs PBKS (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि इशान मलिंगा

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement