PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Streaming: आज पंजाब आणि गुजरात यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे.
PBKS vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये, (IPL 2024) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) 21 एप्रिल म्हणजेच रविवारी दुहेरी हेडरच्या दिवशी आमनेसामने येतील. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)