LSG vs PBKS, IPL 2023 Match 21 Live Score Update: पंजाब किंग्जने लखनौविरुद्ध गोलंदाजी निवडली, दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी सॅम करण कर्णधार
लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई.
पंजाब किंग्ज: अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम करण (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elect to field first against @LucknowIPL.
Follow the match ▶️ https://t.co/OHcd6VfDps#TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/LVduZ8zRP1
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

