IPL 2023 RR vs PBKS: अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पाच धावांनी केला पराभव, नॅथन अॅलिनने घेतल्या चार विकेट
गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. IPL 2023 मध्ये आज बुधवारी एक मोठा सामना खेळला गेला. आजचा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 197 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 86 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावाच करू शकला. राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जकडून नॅथन एलिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)