IND vs BAN 1st Test Day 3 Live Update: शुभमन गिलच्या पहिल्या शतकानंतर पुजाराने ठोकले अर्धशतक, गिल 110 धावांवर झाला बाद, विराट कोहली क्रिजवर

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 150 धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 394 धावांची आघाडी मिळाली

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs BAN 1st Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाने फॉलोऑन केला नाही. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 बळी घेतले. दरम्यान, टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने आपले पहिले कसोटी शतक झळकावून बाद झाला आहे. त्याने 152 चेंडूत 110 धावांची खेळी केली. त्याची विकेट मेहदी हसन मिराजने घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement