PSL 2022 XI: पाकिस्तान सुपर लीगच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ जाहीर; मोहम्मद रिझवान कर्णधार तर बाबर आजम याला यादीतून डच्चू
पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सातवा हंगाम यशस्वीरित्या संपुष्टात आला. अंतिम सामन्यात लाहोर कलंदरने मुलतान सुलतान्सचा 42 धावांनी पराभव करत प्रथमच विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या समाप्तीनंतर समालोचन संघाच्या वेगवेगळ्या सदस्यांनी एकत्रितपणे PSL 7 च्या XI खेळाडूंची निवड केली. यामध्ये मुलतान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याला मोठी जबाबदारी मिळाली आहे.
PSL 2022 XI: पाकिस्तान सुपर लीगचा (Pakistan Super League) सातवा हंगाम यशस्वीरित्या पार पडला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कॉमेंट्री टीमच्या वेगवेगळ्या सदस्यांनी मिळून PSL 7 च्या सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली. या 11 खेळाडूंची यादी संपूर्ण टूर्नामेंटमधील कामगिरीच्या आधारे तयार करण्यात आली आहे, ज्यांचे कर्णधारपद मुलतान सुल्तान्सचे कर्णधार मोहम्मद रिझवानकडे (Mohammad Rizwan) देण्यात आले आहे. तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) या यादीतून गायब आहे.
Rizwan to captain Team of HBL PSL 7
Details here ➡️https://t.co/nrmv9HPOEn#HBLPSL7 #LevelHai pic.twitter.com/O63KSSSUdQ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2022 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

